आर्थिक व्यवहारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : विधानसभा निवडणुकीत पैशांचा गैरवापर  रोखण्यासाठी आणि निष्पक्ष निवडणुका होणे  फार आवश्यक आहे. त्‍यात बँकांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. ज्या खात्यातून अनेक दिवसांपासून कोणतेही व्यवहार होत नसतील आणि आता अचानक त्या खात्यातून व्यवहार होत असतील, तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

उमेदवाराचे एक खाते असताना निवडणूक प्रक्रियेसाठी दुसरे खाते उघडायचे असल्यास त्यांना सहकार्य करावे. बँकेच्या एखाद्या शाखेत पैशांची मागणी अचानक वाढली आहे का? याबाबतही बँकांनी माहिती संकलित करावी. तसेच इतर दैनंदिन व्यवहारांवर देखील लक्ष ठेवावे. काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक आहे, असेही जिल्‍हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही परिस्थितीत पैशांचा गैरवापर, मद्याचा मोफत पुरवठा, भेटवस्तूंचे वाटप किंवा कोणतेही आमिष दिले जाऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासह इन्कम टॅक्स, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, राज्य वस्तू आणि सेवा कर, व्यावसायिक कर सह अन्य यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती जिल्‍हा प्रशासनने दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post