देशात सशत्र क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १८० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे प्रतिनिधी :

पुणे : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १८० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील संगम ब्रीज जवळील वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारक स्थानी फडके स्नेहवर्धिनी तर्फे दिनांक ४ नोव्हेंबर या त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

वासुदेव बळवंत फडके यांनी १८७६ साली इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा पुकारला होता.पुण्यात गुप्त क्रांतिकारक संघटनेची स्थापना त्यांनी केली होती.वस्ताद लहुजी साळवे यांच्या तालमीत दांडपट्टा,तलवार व घोड्यावर बसण्याचे शिक्षण घेतले होते.ब्रिटिश खजिना लुटून, तारा यंत्रे तोडून,तुरुंग फोडून महाराष्ट्रात हाहा:कार माजविला होता.पुण्यातील संगम ब्रीज जवळील जिल्हा न्यायालयात राजद्रोहाचा खटला चालू असतांना त्यांना न्यायालयीन कोठडीत ( सध्याच्या रेकॉर्ड रूम मध्ये) बंदिवासात ठेवले होते.जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी एडन ला रवानगी केली.तुरुंगात अमानुष छळामुळे एडन तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला.

प्रमुख पाहुणे परम विशिष्ट सेवा पदक प्राप्त एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त ) यांचे हस्ते क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी लहुजी क्रांती दलाचे महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष आण्णा भाऊ घोलप यांनी पण वासुदेव बळवंत फडके व आद्य क्रांति गुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या शोर्य विषयक कार्याची उपस्थितांना माहिती दिली सर्वांनी वासुदेव बळवंत फडके यांचा आदर्श घेऊन भारतमातेची सेवा करावी, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

यावेळी फडके स्नेहवर्धिनि चे सुभाष फडके,दिगंबर गोपाळ फडके,दत्तात्रय वामन फडके,दत्तात्रय लक्ष्मण फडके,चंद्रकांत दत्तात्रय फडके,चंद्रकांत प्रभाकर फडके,यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन विजया देशपांडे ह्यांनी केले.

कार्यक्रमास सुरेंद्र प्रधान,मोहन मोने,प्रकाश देशपांडे,सुभाष फडके या बरोबरच अनेक देशभक्त नागरिक उपस्थित होते.


अधिक माहितीसाठी

सुभाष फडके

फडके स्नेहवर्धीनी

मोबाईल

9975613171

फोटो ओळ

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या १८० व्या जयंती निमित्त अभिवादन करतांना एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त ),आण्णा भाऊ घोलप,सुभाष फडके,दि.गो. फडके,द.ल.फडके,चंद्रकांत दत्तात्रय फडके,चंद्रकांत प्रभाकर फडके,द.वा.फडके

Post a Comment

Previous Post Next Post