प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येथील निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या आई वडिलांची व नातेवाईकांची नावेच मतदार यादीतून गायब झाले असल्याचे माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या वेळी कदम यांच्या नातेवाईकांनी मतदानाचा हक्क बजावला होता मात्र त्यानंतर त्यांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे.नातेवाईक औरंगाबाद या ठिकाणी राहतात.
एकनाथ लाटे स्वाती लाटे नंदा लाटे अशी नातेवाईकांची नावे आहेत. याविषयी अधिक बोलताना ज्योती कदम म्हणाल्या मी माझे नाव कमी करण्याचा अर्ज प्रशासनाकडे दिला होता. मात्र प्रशासनाने आई वडिलांचीच नाव कमी केल्याचे समोर आले आहे
Tags
पुणे