प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास महायुतीला सर्व विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात तसेच नाराजांची समजूत देखील काढण्यात यश आले आहे.पुण्यात काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळत आहे. कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून कॉग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस हे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.
कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांचे समजूत काढण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे यांनी त्यांच्याशी भेट घेतली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कमल व्यवहारे ह्या फोन बंद करून नॉटरिचेबल झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे.