मतदान केल्यावर मिळाले निम्म्या किमतीत 'पॉट आईस्क्रीम ' !

कमला नेहरू पार्क जवळ शिरीष बोधनी यांचा उपक्रम

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र  विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे,या हेतूने मतदान करणाऱ्या पुणेकर मतदारांना  निम्म्या किमतीत 'पॉट आईस्क्रीम' चे कप देण्यात आले ! 'शिरीष बोधनीज पॉट आईस्क्रीम' चे संस्थापक शिरीष बोधनी, अमेय बोधनी यांनी हा उपक्रम केला .

 पुण्यात प्रसिद्ध असलेले लाकडी पॉट मध्ये केलेले आईस्क्रीम हे वर्षभर आकर्षण असते.कमला नेहरू पार्क दत्त मंदिराजवळ  (प्रभात रस्ता)येथे शिरीष बोधनी हा व्यवसाय करतात.तेथेच हा उपक्रम उत्साहात पार पडला .त्यांचे पॉट आइसक्रीम ४० वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाहीचे कर्तव्य बजावणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे,यासाठी ,दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाच्या दिवशी दुपारी १२ ते २ या कालावधीत मतदान करून आलेल्या मतदाराला आईस्क्रीम कप निम्म्या किमतीत दिला जाईल, असे त्यांनी घोषित केले होते .

 मतदारांनी मतदान करावे ,यासाठी प्रोत्साहन दिले गेले,असे शिरीष बोधनी यांनी सांगितले. एरवी हे आईस्क्रीम ६० रुपयांना दिले जाते,मतदानाच्या दिवशी ते निम्म्या किमतीत म्हणजे ३० रुपयांना दिले गेले .

'पॉट आईस्क्रीम'ची लज्जत

पुण्यातील उन्हाळ्याला अनेक दशकांपासून स्पॉट आईस्क्रीमने लज्जत मिळवून दिली आहे. वाड्यामध्ये सहकुटुंब पॉट फिरवून,बर्फ,मीठ टाकून, स्वतःच्या मेहनतीचे आईस्क्रीम तयार करणाऱ्या पुणेकरांना थेट घरोघरी आईस्क्रीम पुरवण्याची सेवा शिरीष बोधनी यांनी अनेक दशकांपूर्वी सुरू केली होती. त्यांच्या बरोबरचे पॉट आईस्क्रीम व्यवसायिक थांबले तरी बोधनी यांनी पॉट आईस्क्रीम पुणेकरांच्या साठी उपलब्ध ठेवले आहे.निव्वळ दूध आणि अस्सल फ्लेवर त्यामुळे पॉट आईस्क्रीम पुण्यात नावाजले जाते. यामध्ये कोणतीही भेसळ नसते आणि ते कृत्रिम पदार्थ टाकून अधिक लज्जतदार केले जात नाही.आईस्क्रीमचा मूळ स्वाद टिकून राहण्यासाठी आईसक्रीमची प्रक्रिया पुणेकरांच्या पसंतीसही उतरली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post