मतदान यंत्रात ईस्त्राईल कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन फेरफार करण्यात आला. प्रशांत जगताप

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : विधानसभा निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदान यंत्रात ईस्त्राईल येथील कंपनीच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन फेरफार करण्यात आला. यामध्ये महायुतीच्या उमेदवरांच्या मतदानात 15 ते 25 टक्के वाढ करण्यात आली असा आरोप हडपसर विधानसभा मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला.ईस्त्राईलमधील काही जण ओळखीचे असून त्यांनी यासंदर्भात माहिती दिली असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

ईव्हीएम बाबत असणार्‍या तक्रारी संदर्भात पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांची राष्ट्रवादी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधीज्ञ असीम सरोदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, महाविकास आघाडीचे सचिन दोडके, रमेश बागवे, दत्ता बहिरट, अशोक पवार आदी उपस्थित होते.

या बैठकीतनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना प्रशांत जगताप म्हणाले, मतदान यंत्रे हॅक करुन 15 ते 25 टक्के मतदान सेट करण्यात आले होते. मागच्या 25 वर्षांच्या काळात निवडणूकीत पराभव झाल्यानंतर आम्ही जनतेचा कौल मान्य केला आहे. यंदाच्या निवडणूकीत हा जनतेचा कौल नसून महायुतीच्या उमेदवरांसाठी पडद्यामागुन शक्तीनी यंंत्रणा वापरून मतदान यंत्रात बदल घडविला आणि त्यातुन झालेला हा पराभव आहे.

मतदान यंत्राच्या आधी मतपत्रिकेवर मतदान घेण्यात येत होते. त्यावेळी मतपेटी उघडून त्यात काही नसल्याचे दाखवून ते सिल करण्यात येत होते. तीच पद्धत मतदान यंत्रासंदर्भात वापरली जाते. सुरूवातीला मॉक पोल करुन झीरो मतदान दाखविले जाते. त्या मशीनला मतदानाच्या दिवशीचा चिन्ह अपलोड करतांना सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंतचा प्रोग्रम दिला जातो. यामुळे मतदानाच्या दिवशी प्रोग्रॅम काम करतो. हा प्रोग्रॅम निवडणूकीच्या आधी आणि नंतर काम करत नाही, असे जगताप यांनी सांगितले.

आयोगाकडे पैसे भरणार 

व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पैसे भरणार आहे. हडपसर मतदासंघात 532 मतदान केंद्र होते. त्यातील 5 टक्यांप्रमाणे 27 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचे मोजणी करण्यात येईल. याच बरोबर न्यायालयात याचीका दाखल करण्यात येणार आहे. न्यायालया समोर ईव्हीएम संदर्भातील सगळे पुरावे सादर करणार.

Post a Comment

Previous Post Next Post