प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड. पेठ वडगाव येथे दिनांक 23 नोव्हेंबर, 2024 रोजी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पाककला स्पर्धेमध्ये बनवलेल्या पदार्थांमध्ये विविधता होती. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणले होते. त्यामध्ये पौष्टिकता, पदार्थाचा गुणधर्म, पदार्थाची चव, पदार्थ मांडण्याची सजावट पद्धती, पदार्थ बनवण्यासाठी घेतलेली मेहनत इत्यादी निकषांचा विचार करून स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांचे क्रमांक काढण्यात आले. त्यासाठी महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल.,सहा.प्रा.डॉ.पवार ए.आर.सहा.प्रा.सोरटे एस. के. सहा.प्रा. शिरतोडे व्ही.एल. सहा.प्रा.सावंत ए.पी. सहा.प्रा. शिंदे आर. डी. , सहा.प्रा.चांदवले एस.एस.,ग्रंथपाल चौगुले एस. एस. या सर्वांनी सहकार्य केले. सर्वानुमते पदार्थांचे परीक्षण करून गोड पदार्थ व इतर पदार्थ अशा दोन भागांमध्ये वर्गीकरण करून दोन गटांमध्ये तीन-तीन गुणांकन देण्यात आले.
गोड पदार्थांमध्ये (पौष्टिक मेथी ड्रायफ्रूटस् लाडू) वर्षा कोळी प्रथम क्रमांक,( हाळीव लाडू )अपर्णा काटकर द्वितीय क्रमांक,( गुळ, तीळ व शेंगदाणा बर्फी) अश्विनी डबके तृतीय क्रमांक असे गुणांकन देण्यात आले. इतर पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक सुप्रिया गिरिगोसावी(३ प्रकारचे थालीपीठ , बेसन वडी,सॅलड ,ठेचा, दही, उसळ), द्वितीय क्रमांक सदफ मोमीन (लजीज पुलाव, शाही तुकडा, कोशिंबीर), तृतीय क्रमांक दिपाली परीट (मोड आलेल्या कडधान्याची भेळ) असे गुणांकन देण्यात आले. इतर सहभागी विद्यार्थ्यांनी ही आवळा लोणचे, थापलेली वडी, उकडीचे तांदळाचे मोदक, ढोकळा असे वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचा उत्साह निदर्शनास आला. तसेच प्राचार्या ,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक सर्वांनीच या पाककला स्पर्धेचा मनमुराद आस्वाद घेतला.