प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील प्ले ग्राउंड येथे रिक्षात बसलेला प्रवासी लघुशंकेसाठी थांबला असता त्याच्या सीटवरील पाकिट आणि मोबाइल घेऊन रिक्षाचालकाने पोबारा केला. यात सुमारे १६ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याची फिर्याद लहू धोडिंराम पाटील (वय ३७, मूळ रा. सावर्डे ता. कागल, सध्या रा. दु्र्वा अपार्टमेंट, गोकुळनगर, धानोरी, पुणे) यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. हा प्रकार २२ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला होता.
या घटने विषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पाटील हे कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकातून ऑटो रिक्षा केली. ते शास्त्रीनगर प्ले ग्राउंड येथे आले असता लघुशंकेसाठी उतरले.त्या वेळी त्यांचे पाकिट आणि मोबाइल रिक्षाच्या सीटवर होते. त्या वेळी रिक्षाचालकाने पाटील यांना तेथेच सोडून त्यांचे पाकिट आणि मोबाईल घेऊन पळ काढल्याचे सांगितले . पाकिटात रोख रक्कम ६ हजार रुपये आणि मोबाइलची किंमत सुमारे १० हजार असा एकूण सोळा हजारांचा मुद्देमाल असल्याची माहिती दिली.
टिंबट मार्केट येथुन दुचाकी लंपास .
कोल्हापूर - टिंबर मार्केट येथे कमानीजवळील एका प्लायवूडच्या दुकानाजवळ लावलेली मोटारसायकल चोरट्याने लंपास केली.हा प्रकार १ जुलै, २०२४ च्या दरम्यान घडला होता. या बाबतची फिर्याद सागर दावीत अवघडे (वय ४२ रा. मौजे वडगांव, ता. हातकणंगले) यांनी दिली असून जुना राजवाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.