स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- हातकंणगले तालुक्यातील तारदाळ येथे परप्रांतिय सुनिलकुमार भगवानदास रावत (रा.सिहौलीया ,मध्यप्रदेश .सध्या रा.आवाडे पार्क तारदाळ) याचा गळा आवळुन खून केल्या प्रकरणी आरोपी पुष्पराज रामसिंह गाडे ( वय21 रा.सिहौलीया ,मध्यप्रदेश) संतोषकुमार जोगेश्वर सिंह (वय 19.रा मध्यप्रदेश) शिवेंद्र रामकुशन सिंह (वय 19.रा मध्यप्रदेश) आणि एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा.सध्या आवाडे पार्क ,तारदाळ ता.हातकंणगले) यांना कोणताही पुरावा नसताना आपल्या कौशल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
अधिक माहिती अशी की,हातकंणगले तालुक्यातील तारदाळ येथे रेल्वे रुळावर रविवार (दि.03) रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिस घटना स्थळी जाऊन पाहिले असता त्या मृतदेहावर रेल्वे जाऊन त्याचे दोन तुकडे झाले होते.सदर मृतदेहाचा गळा आवळुन खून केल्याचे दिसून आले.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला याचा तपास करून मयताची ओळख पटवून आरोपीना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुशंगाने आजूबाजूच्या भागात मयताचा फोटो दाखवून माहिती घेत असताना पोलिसांना मयताचे नाव सुनिलकुमार भगवानदास रावत असून तो मध्यप्रदेशातील सिहौलीया येथील असून तो कामा निमित्त तारदाळ येथे आवाडे पार्कात रहात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार तपास करीत असताना त्याचा पुष्पराज गाडे यांच्याशी वाद झाल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी पुष्पराज गाडे याचा शोध घेत असताना तो आणि त्याचे साथीदार जयसिंगपूर येथे रेल्वे स्टेशन जवळ मिळुन आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी पुष्पराज गाडे याच्या पत्नीशी मयत सुनिलकुमार रावत याचे अनैतिक संबंध असल्याने आरोपीने सुनिलकुमार याला गावी जायाचे आहे असे खोटे सांगून घराच्या बाहेर घेऊन गेला.त्यानंतर आरोपी पुष्पराज याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सुनिलकुमार रावत याचा गळा आवळुन खून करून त्याचा मृतदेह तारदाळ येथे रेल्वे रुळावर टाकल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील,इंचलकरंजीचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे ,उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.