प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- टेम्पो रस्त्यात का थांबविला म्हणुन मोटारसायकल वरुन आलेल्या पोलिसाने केलेल्या मारहाणीत जखमी झाल्याने सागर विश्वास मोरे (वय 34.रा.मोरेवाडी) याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील जखमी सागर हा मंगळवार(दि.26) रोजी दुपारी दोनच्या सुमारास कावळानाका मार्गे शिवाजी विद्यापीठाकडे जात असताना वाटेत कृषी महाविद्यालय रोडवर कोल्हापूर महानगरपालिकेचा डंपर बंद पडला होता.त्याच्या मागे ट्रक असल्याने टेम्पो चालकाने आपला टेम्पो ट्रकच्या पाठीमागे थांबविला .त्या वेळी मोटारसायकल वरुन आलेल्या पोलिसाने वाटेत टेम्पो का थांबवला म्हणुन मारहाण केली.अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.