प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- लक्ष्मीपुरी येथील शाहु क्लॉथ मार्केट येथे असलेल्या केमटी परिवहन ऑफिसात काम करीत असताना श्रीकांत उर्फ बाबा बापूसो पाटील (वय 70.रा.पांडुरंग नगरी ,क्रशरचौक देवकर पाणंद को.) यांचा बुधवार (दि 06) रोजी दुपारी बाराच्या सुमारास काम करीत असताना अचानक चक्कर येऊन बेशुध्द पडले.त्यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हे जिल्हा परिषद लिपीक म्हणुन काम करीत होते.ते रिटायर झाल्यानंतर केमटी परिवहनकडे कॉन्ट्रक्ट बेसीसवर लिपीक म्हणुन काम करीत होते.आज सकाळी कामावर आल्यानंतर काम करीत असताना चक्कर आल्याने त्यांचा मृत्यु झाला.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी ,एक मुलगा,बहिणी आणि भाऊ आहे.