फरारी आरोपीला पुण्यातून अटक. जुना राजवाडा पोलिसांची कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- गेल्या दिड  वर्षापूर्वी शिवाजी पेठ येथे  संभाजी पांडुरंग फाले (रा. फुलेवाडी) याच्यावर  पाठलाग करून  प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी दहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली.यात  आठ जणांना अटक झाली होती. तर फरारी असणारा आरोपी विकास ऊर्फ चिक्या बंडोपंत भिऊंगडे (वय ३३, रा. लक्षतीर्थ वसाहत) याचा पोलीस शोध घेत होते. विकास याला जुना राजवाडा पोलिसांनी पुण्यातून सोमवारी अटक केली.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपींना  शोधून काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने जुना राजवाडा पोलिस  ठाण्याचे  पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी गुन्हेशोध पथकाचे उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यावर कामगिरी सोपवली होती. गळवे यांना खबऱ्याकडून माहिती समजली की, मोक्कातील आरोपी विकास भिऊंगडे हा ऊरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे येथे साई पाटील या नावाने आपली ओळख लपवून रहात असल्याची माहिती मिळाली.

पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, सतीश बांबरे, अमर पाटील, प्रवीण सावंत, प्रशांत पांडव, संदीप माने, वैभव खोत, नीलेश नाझरे, मोहन लगारे यांच्या पथकाने पुण्यात सापळा रचून फरारी आरोपी विकास भिऊंगडे यास अटक केली.

बॅनर फाडण्याच्या कारणावरून पूर्ववैमनस्यातून ३१ मे,२०२३ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजी पेठेत प्रकाश बोडके व संभाजी फाले यांच्यावर पाठलाग करून हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी विकास भिऊंगडे यांच्यासह दहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. आठ आरोपी अटक झाले होते. तर विकास हा फरारी होता. जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post