धनंजय महाडिक यांचेवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर येथे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रचार सभेत बोलताना जीभ घसरली 'लाडकी बहीण' योजनेतील पंधराशे रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत आढळल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या आणि माझ्याकडे पाठवा… आम्ही व्यवस्था करतो,' अशी जाहीर धमकी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी कोल्हापूरच्या सभेत दिल्याने जिल्ह्यात सर्व उडाली आहे .
एवढेच बोलून न थांबता, धनंजय महाडिक यांनी त्यापुढे जाऊनही आणखी धक्कादायक विधान केले. 'जर मोठय़ाने कोण भाषण करायला लागली, दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा. खाली सही कर म्हणायचं. लगेच उद्या पैसे बंद करतो म्हणायचे. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत,' असे वक्तव्यही त्यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. धनंजय महाडिक यांनी केलेला खुलासा निवडणूक आयोगाने अमान्य केला असून, त्यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आमदार सतेज पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे.
धनंजय महाडिक हे भाजपचे खासदार आहेत; त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी महिलांना धमकी देण्याचे वक्तव्य केले आहे. महाडिक यांची पार्श्वभूमी कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. गुंडगिरीची भाषा अन् या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा महाडिक कंपनीचा राहिला आहे. पण असल्या धमकीस आमच्या माता-भगिनी घाबरणार नाहीत. घरातले पैसे दिल्यागत ते बोलत आहेत. 'छाती बडवून घ्या', असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा आमदार सतेज पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे.