लाडक्या बहिणीनां आक्षेपार्ह विधान करून धमकावणाऱ्या खासदारांवर कारवाई करा. राष्ट्रीय महिला कॉग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांची निवेदनाद्वारे मागणी.

 

      कॅप्शन   - जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना निवेदन देताता राष्ट्रीय महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा, सोबत निरीक्षक आरती सिंग, सरलाताई पाटील, चंदा बेलेकर आदी....

----------------------------------------------------------------------

प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुरु केलेल्या  लाडक्या बहिण योजनेचे लाभ घेणाऱ्या महिला कॉँग्रेसच्या प्रचार सभेत दिसल्या तर त्यांचे व्हिडीओ करा,फोटा काढा,त्यांची व्यवस्था केली जाईल. अशी धमकी देणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पोलीस व निवडणूक आयोगाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज  अखिल भारतीय महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना सोमवारी सायंकाळी निवेदन  दिले.

    या निवेदनात पुढ़े  म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूका होत आहेत. यात महिलाही मोठ्या संख्येने  सहभागी होत आहेत. मात्र शासकीय लाभ घेणाऱ्या महिलांना धमकावण्याचे काम काही जणांच्या कडुन  केले जात आहे. त्यामुळे महिलांच्या मनात एक प्रकारची भिती निर्माण होत आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचा अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. आज पोलीस ठाण्यातही निवेदन दिले आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलीस व निवडणूक आयोगाने याबाबत योग्य ती कारवाई करावी.

   यावेळी कॉग्रेसच्या निरीक्षक आरती सिंग, कोल्हापुरातील  सरलाताई पाटील, चंदा बेलेकर, विनायक घोरपडे, ऋषीकेश पाटील आदी हजर होते.

--------------------------------------

 

Post a Comment

Previous Post Next Post