दोघां मोटारसायकल चोरट्यांना अटक करून चार लाख रुपये किमंतीच्या सात मोटारसायकली जप्त , स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दोघां मोटारसायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडील चार लाख रुपये किमंतीच्या सात मोटारसायकली जप्त मोटारसायकल चोरीचे दाखल असलेले सहा गुन्हे उघडकीस आणले.या प्रकरणी अभिषेक सुरेश खोत (वय 22)आणि हर्ष योगेश कोलप (वय 19.दोघे रा.गडमुडशिंगी) यांना अटक केली.त्यांच्यावर गांधीनगर,गोकुळशिरगाव ,कागल पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक तर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते.ते उघडकीस आणले.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.त्या अनुशंगाने माहिती घेत तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना गडमुडशिंगी येथील अभिषेक खोत हा आपल्या साथीदारा समवेत चोरीतील मोटारसायकल विक्री साठी शनिवार (दि.09) रोजी मुडशिंगी ते हुपरी मार्गावर असलेल्या हॉटेल सावली येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल ही गांधीनगर येथून चोरीस गेल्याची माहिती मिळाली.त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आणखी पाच मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.वरील प्रमाणे सहा गुन्हे उघडकीस आणुन एका मोटारसायकल चोरीची माहिती घेण्याचे काम चालू होते.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post