प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- गडहिग्लज येथील राज्य उत्पादन विभागाकडुन चंदगड तालुक्यातील तुड्ये गावच्या परिसरात निळ्या रंगाची मारुती गाडीत विदेशी मद्याने भरलेल्या हनी कंपनीची ब्र्य्ंडी 180 .मिलीचे 27 बॉक्स आणि गोल्ड़न एस ब्लु फाइन व्हिकी 180.मिलीच्या 14 बॉक्स असे एकूण 41 बॉक्स वहातुक करीत असताना मिळाल्याने त्याची एकूण किमंत तीन लाख 14 हजार रुपये याच्या बरोबर ओमनी कार वाहनांसह असा एकूण सहा लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक उमेश गोंविद आवडण (वय 38.रा.तुड्ये ,ता.चंदगड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का तसेच जप्त केलेली गोवा बनावटीची दारु कुणासाठी आणली होती याचा तपास सुरु आहे.
ही कारवाई गडहिग्लज येथील राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षक श्री.प्रमोद खरात,दुय्यम निरीक्षक दिवाकर वायंदडे, स्वप्निल पाटील जवान संदिप जानकर ,संदिप चौगुले ,भरत सावंत,महिला जवान स्वप्नाली बेडगे,आणि वाहन चालक अविनाश परिट यांनी केली.याचा पुढ़ील तपास निरीक्षक दिवाकर वायंदडे हे करीत आहेत.