प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-केर्ले येथील हणमंत मल्हारी गायकवाड (वय 32.रा.लाड गल्ली ,केर्ले) यांने गुरुवार (दि.14) रोजी सकाळी सहाच्या सुमारास घरातील हॉल मधील छताच्या तुळईला साडीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हा ड्रायव्हरचे काम करीत होता.आज सकाळी ऊसतोड कामगार त्याला बोलविण्यासाठी त्याच्या घरी गेले असता हा प्रकार निदर्शनास आला.त्याच्या पश्च्यात वडील ,पत्नी ,तीन मुली,एक भाऊ आणि एक बहिण आहे.