प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुरची क्रिडा पंढ़री अशी ओळख असलेल्या कोल्हापूर येथील कोल्हापूर जिल्हा पोलिस विभागाला क्रिडा स्पर्धा आयोजन करण्याचा मान मिळाला आहे.ही स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 5 डिसेबर या दरम्यान पोलिस मुख्यालय येथील पोलिस मैदानावर रंगणार आहे.या स्पर्धेत फुटबॉल,जलतरण ,हॉकी,ज्युदो,अथलेटिक्स ,कबड्डी,कुस्ती,खो-खो,व्हॉलिबॉल बॉक्सिंग ,वेटलिफ्टिंग याच्यासह इतर खेळाचा समावेश आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.तसेच या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा 4 डिसे.रोजी सायंकाळी 4 वाजता पुणे विभागाचे आयुक्त मा.डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेत. कोल्हापूर ,सांगली ,सातारा,पुणे ग्रामीण,सोलापूर शहर - ग्रामीण सहभागी होणार आहेत.त्याच प्रमाणे 2 डिसे.रोजी सकाळी पोलिस अधिकारी आणि पत्रकार यांच्यात क्रिकेट सामना होणार आहे.या स्पर्धेचे बोध चिन्ह म्हणुन " गवा "या प्राण्याची सुवर्ण क्रिडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
हे सामने कोल्हापूर पोलिस मुख्यालय येथील पोलिस मैदान,छत्रपती शिवाजी विद्यापीठ,राजर्षी छत्रपती शाहु कॉलेज आणि शहाजी लॉ कॉलेज येथे होणार आहे.या स्पर्धेचा उद्देश पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वरील ताण हलका करण्याचा प्रयत्न ,त्यांना थोडा विरंगुळा आणि त्यांच्यातील खेळाला उत्तेजन देण्यासाठी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कोल्हापूर येथील क्रिडा प्रेमीनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे