प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- विधानसभा निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी, नागरीकांनी आदर्श आचासंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. यासाठी पोलीसांनी तगडा चोख नियोजन व तगडा पोलीस बंदोबस्त नेमला आहे. कुठे गैरप्रकार आढळला तर नागरीकांनी तातडीने पोलीसांना माहिती द्यावी. पोलीस २४ तास अलर्ट आहेत. परिक्षेत्रात ३६ तपासणी नाक्यांवर नार्कोटिक्स श्वानाव्दारे कसून तपासणी सुरू आहे. गेल्या पंचवीस दिवसात २० कोटी रुपयांची मुद्देमाल जप्त केली आहे. अशी मााहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुल्लारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सोलापूर ग्रामीण या तीन जिल्हयांच्या सीमा कर्नाटक राज्याच्या सीमेशी असुन निवडणुक काळात कर्नाटक राज्यातुन अवैध वस्तुच्या तस्करी रोखण्यासाठी तीन जिल्हयात एकुण ३६ सीमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. येथे केंद्रीय, राज्याचे व स्थानिक पोलीसांची पथके नेमलेली आहेत. समाजातील उपद्रवी लोकांवर कायदेशीर कारवाई, अजामीनपात्र वॉरंटची बजावणी, कोबिंग ऑपरेशन, संवेदनशील भागात रुट मार्च या सारख्या कारवाई सुरु आहेत.
परिक्षेत्रात एकुण ६.६४ कोटी रोख रक्कम, २.८३ कोटी रुपये किंमतीची दारु व रसायन, २२ लाख २४ हजार रुपये किंमतीचा ११३ किलो गांजा, ७.५७ कोटीचे ९ किलो सोने व ६० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १.८७ कोटी किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलेला आहे. असा तब्बल २० कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीसांनी आजपर्यंत २३ अवैध अग्निशस्त्रे व ३६ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत. सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. आदर्श निवडणुक आचारसंहिता उल्लंघनाच्या अनुषंगाने कोल्हापूरात ३ दखलपात्र व ९ अदखलपात्र, सांगलीत १ दखलपात्र २ अदखलपात्र, सोलापूर ग्रामीणमध्ये १ दखलपात्र व १ अदखलपात्र व पुणे ग्रामीणमध्ये ५ दखलपात्र व ३ अदखलपात्र असे एकुण १० दखलपात्र व १५ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.
पत्रकार परिषदेला उपअधीक्षक पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे. एलसीबीचे निरीक्षक रविंद्र कळमकर,सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आदी हजर होते.
-----------
डिजिटल द्वारे अटकेची बतावणी.
डिजिटल अटक झाली आहे. असे सांगून फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. सुशिक्षीत लोकही यात फसले आहेत. डिजिटल अटक असा काहीच प्रकार भारतात अस्तित्वात नाही. त्यामुळे कोणाचा फोन आला तर तातडीने पोलीसांशी सपर्क साधा. अशा भामट्यांचे काहीच ऐकून घेऊ नका. पोलीसांच्या आपत्कालीन नंबरवरही संपर्क करू शकता.
-----------
तोतया पथकांपासून सावधान..
तावडे हॉटेल परिसरात एका व्यावसायीस भरारी पथकाचे अधिकारी आहोत असे सांगून पाच जणांनी २५ लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी संशयीतांचा पोलीस शोाध घेत आहेत. एलसीबीचे पथक त्यांच्या मागावर आहे. लवकरच या टोळीचा छडा लागेल. मात्र भविष्यात अशा तोतया पथकापासून व्यापारी,उद्योजकांनी सावध रहावे असे आवाहन पोलिस महानिरीक्षक सुनिल फुल्लारी यांनी केले.