प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आंतरराज्य सीमाभागातील अधिकारयां सोबत बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीत आंतरराज्य तपासणी नाके ,अजामीन वॉरंट,भेट वस्तु वाटप,अवैद्य रोख रक्कम,याची होत असलेली वाहतूक आणि गुन्हेंगारांची माहिती घेऊन सीमेवर असलेल्या कर्नाटकातील गुन्हेगारांची देवाण घेवाण करण्याच्या सूचना दिल्या.
ही बैठक गुरुवार (दि.14) रोजी मा.विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली.
या बैठकीत आंतरराज्य सीमा नाके कामगिरीचा आढ़ावा घेऊन अजामीन वॉरंट ,फरारी आरोपी,सीमा भागातील गुन्हेगारी टोळ्या व गुन्हेगारांची माहिती एकमेकांना प्रदान करून संबंधित गुन्हेगारांना वॉरंट बजावण्यास प्राधान्य देऊन त्या मुळे निवडणुक काळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेंगारावर लक्ष ठेवता येईल.तसेच महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील पोलिस ठाण्यानी एकमेकाशी संपर्क ठेऊन भेटी देऊन बैठकीचेही आयोजन करून गोपनीय माहिती एकमेकांना अदान प्रदान करण्यात यावी.जेणे करून अवैद्य रोख रक्कम,मद्यसाठा,गुटखा आणि अंमली पदार्थ यांची होत असलेली वाहतूक यांची माहिती एकमेकांना देण्यात याव्यात .
याच प्रमाणे मतदानाच्या तीन दिवस अगोदर सीमा भागातील सीमा रेषा बंद करून मतदान आणि मतमोजणी दिवशी मद्य विक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या .आगामी काळात सीमा रेषेवर विशेष लक्ष ठेऊन बेकायदेशीर गांजा,दारु ,पैसे (भेट वस्तु) याच्यावर लक्ष ठेऊन संबंधितांवर कारवाई करण्यावर भर दयावा.इत्यादी बाबीवर चर्चा करून कृती आराखडा तयार करण्यात आला.या साठी दोन्ही राज्याचे सीमा शुल्क विभाग ,वस्तु व सेवाकर विभाग ,प्रादेशिक परिवहन विभाग आणि वन विभाग यांची या काळात मदत घेतली जाणार आहे.
ही बैठक कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.या बैठकीस बेळगावी परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक श्री.विकास कुमार विकास ,बेळगाव शहरचे पोलिस आयुक्त श्री.मार्टीन,पोलिस उपनिरीक्षक कलबुर्गी,अजयकुमार हिलोरे,बेळगावी ग्रामीणचे डॉ.भिमाशंकर गुळवे,विजापूरचे पोलिस अधीक्षक प्रसन्न देसाई,बिदरचे श्री.प्रदिप गुट्टी,श्री .अद्दरु श्रीवासलु,कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,सोलापूरचे ग्रामीणचे अतुल कुलकर्णी,सांगलीच्या श्रीमती रितु खोकर आणि अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई हे हजर होते.