संशयातुन मारहाण झालेल्या तरुणाने नैराशेतुन विषारी औषध सेवन केल्याने तरुणाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कागल तालुक्यातील बेनिक्रे येथील नामदेव दगडू यादव (वय 23) याने शुक्रवार (दि.08) रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास कागल तालुक्यातील बस्तवडे नदीकाठी ग्रामोझोन नावाचे विषारी औषध सेवन केल्याने त्याला त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी निपाणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना शनिवारी सकाळी दहाच्या  सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत हा आई वडील आणि भावा  समवेत बेनिक्रे गावी रहात होता.तो अविवाहित असून गेल्या तीन वर्षांपासून गोकुळशिरगांव एमआयडीसी येथे श्री गणेश इंडस्ट्रीज मध्ये नोकरी करत होता.त्याने तेथेच  गोकुळशिरगांव येथे खानावळीत  मेस लावली होती.त्याच खानावळी मध्ये पार्ट टाइम जॉब करीत होता.भाऊबीज दिवशी आपल्या गावी मावस बहिणीकडे आला होता.संशयीताच्या पत्नीने मेसेज करून ओवाळण्यासाठी बोलावून घेतले होते.त्याला ओवाळल्यामुळे संशयीताला संशय आल्याने या  कारणातुन  शुक्रवारी मारहाण झाल्याने त्या मारहाणीत त्याच्या हातावर मारहाणीचे व्रण दिसत होते .या झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे नैराशेतुन विष प्राशन केले.अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.या घटनेची कागल पोलिसांना समजताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठी नुसार आणि त्याच्या हातावर व्रण मुळे मयताच्या नातेवाईकांनी  कागल पोलिसांच्याकडे संशय व्यक्त करुन मारहाण केलेल्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

Post a Comment

Previous Post Next Post