प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे फॉरेस्ट खात्याच्या हद्दीत बेकायदेशीर असलेली दारुभट्टी काढ़त असताना दारुभट्टीवाल्याने केलेल्या मारहाणीत वनरक्षक मच्छींद्र दत्तु नवाळे (वय 36.रा.सध्या बाजारभोगांव) हे जखमी झाले.याची फिर्याद पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली आहे.
यातील जखमी नवाळे हे वन कर्मचारी असून बुधवार (दि.13) रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास कर्तव्यावर असताना उंड्री जंगल कर्पामेंट नं.838/बी.मध्ये फिरती करत असताना तेथे असलेल्या ओढ़याच्या काठा वरती बेकायदेशीर दारुभट्टी चालू असलेली निदर्शनास आली. या बाबत संबंधितांकडे विचारणा केली असता त्यांनी वन रक्षकाशी बाचाबाची करुन काठीने मारहाण करून त्यांच्या अंगावर कुत्रे सोडल्याने पळुन जात असताना त्यांच्या पायावर दगडाने मारुन जखमी केले.या घटनेची माहिती पन्हाळा वनक्षेपाल अनिल मोहिते यांनी पन्हाळा पोलिसांना दिली.याची फिर्याद पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली आहे. पन्हाळा पोलिसांनी जखमीला उपचारासाठी पन्हाळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले तेथील रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविले असता तेथे औषधोपचार घेऊन गेल्याची माहिती बाजारभोगांव परिमंडळचे वनअधिकारी राजाराम रसाळ यांनी दिली.सदरची दारुभट्टी बांदिवडे येथील दिनकर सावंत यांची असल्याची माहिती दिली असून वनरक्षक मच्छिंद्र नवाळे यांना दिनकर सावंत यांनी आणि त्यांच्या बहिणीने मारहाण केल्याची माहिती दिली.या दोघांच्या विरोधात पन्हाळा पोलिस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. जखमीला वनअधिकारी राजाराम रसाळ आणि दोन वनसेवक सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले होते.