प्रेस मीडिया लाईव्ह ;
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- शिवीगाळ केल्याच्या रागातुन घरात घुसून धमकावल्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिवराज चंद्रकांत पोवार (वय 30.रा.उरुणकर बोळ,सोमवार पेठ) आणि आदित्य मनोहर पोवार (वय 22.रा.मुळगाव तळेरे सिंधुदुर्ग सध्या कनाननगर ,को.) या दोघांना अटक केली .
अधिक माहिती अशी की,मंगळवार (दि.19) रोजी रात्री एकच्या सुमारास सोमवार पेठ येथील पठाण बिल्ड़ींग येथे रहात असलेला फारुख बाबासाहेब खान (वय 33.पठाण यांच्या घरी भाड्याने) याचा वारे वसाहत येथील मित्र खंडू माने यांच्या बरोबर झालेल्या शिवीगाळ कारणातुन शिवराज पोवार आणि आदित्य पोवार या दोघांनी फारुख खान यांच्या घरात घुसून हातात कोयता घेऊन घरातील लोकांना अश्लिल भाषा वापरुन ठार मारण्याची धमकी देऊन फारुख खान यांच्या रिक्षाची नासधूस करून त्या रिक्षाची काच आणि सिट फाडल्या प्रकरणी फारुख खान यांने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.फिर्यादीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील दोघांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.याचा पुढ़ील तपास हेड कॉ.मोमीन करीत आहेत.