प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- इलेक्ट्रीक पोल वरुन मिटर पर्यत लाईट जोडण्यासाठी सात हजार रुपयांची लाचेची मागणी करणारयां विज मंडळातील कर्मचारी रज्जाक हुसेन तांबोळी (वय 50 .रा.हुसेन मंझील ,इदगाह मैदान जवळ,मिरज) आणि आकाश शंकर किटे (वय 33.रा.धुळेश्वर नगर ,कबनूर) या दोघांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडुन त्यांच्या विरोधात इचलकंरजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार हे इलेक्ट्रीक कॉट्रॅक्टर असून त्यांच्या ग्राहकाला पॉवरलुम चालू करण्यासाठी 26 HP चे पॉवरलुम कनेक्शन साठी चंदूर येथे असलेल्या मराविवि या कार्यालयाकडे दि.30/10/24 अर्ज केला होता.या विज कार्यालयातील लाइनमन रज्जाक तांबोळी यांच्याकडे दिला त्यावेळी वायरमन तक्रारदार सोबत हजर होते.त्यावेळी पोल वरुन मिटर चालु करून देतो त्या साठी मिस्त्रीला सात हजार रुपये देण्यासाठी तांबोळी यांनी तक्रादाकडे सात हजार रुपयांची लाचेची मागणी केली.त्यात तडजोड करून पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले.दरम्यान तक्रादाराने लाचलुचपत विभागाकडे लाच मागत असल्याची तक्रार केली.या तक्राराची पडताळणी करून आरोपी आकाश किटे यांनी रज्जाक तांबोळी यांच्या साठी तीन हजार रुपये आणि स्वतः साठी दोन हजार रुपये असे एकूण पाच हजारांची लाचेची मागणी केल्याचे दिसून आले.या पथकातील पोलिसांनी मंगळवार (दि.12) रोजी रज्जाक तांबोळी यांनी तक्रारदाराकडुन पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली.
ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील,पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला ,पोलिस अजय चव्हाण ,सुनिल घोसाळकर ,सुधीर पाटील,कृष्णा पाटील,चालक कुराडे यांनी केली.