विक्री साठी आलेल्या युवकाकडुन पिस्टलसह काडतुस जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-  पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसेची विक्री करण्यासाठी आलेल्या कंळबा परिसरातील सुर्वेनगर येथील विजय राजेंद्र कांबळे (वय 36) स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्याच्या कडील एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्याच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी शस्त्रे,हत्यारे जवळ ठेऊन त्याची विक्री करीत असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या .त्या अनुशंगाने माहिती घेत असताना विजय कांबळे हा हॉकी स्टेडियम येथे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली असता त्याला सापळा रचून ताब्यात त्याची झडती घेतली असता एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली.या पथकातील पोलिस त्याच्या कसून चौकशी करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post