भाजपा ,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई आणि मित्रपक्ष महायुती विजयी निर्धार सभा प्रचाराचा शुभारंभ

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : भाजपा ,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई आणि मित्रपक्ष महायुती विजयी निर्धार सभा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातुन करण्यात आला.या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते वचननामा प्रसिद्ध करण्यात आला.

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,मा.रामदास आठवले,मा.जोगेंद्र कवाडे ,मित्र पक्षाचे दहा उमेदवार यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.या वेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश केलेल्या आ.जयश्रीताई जाधव,सत्यजित कदम यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी मित्र पक्षाचे कार्यकर्ते,लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापूरच्या प्रचार सभेत महायुतीकडून १० वचने जाहीर

१) लाडक्या बहिणींना रु.२१००

प्रत्येक महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!

२) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.१५०००

प्रत्येक वर्षाला रु.१२,००० वरुन रु.१५,००० देण्याचे तसेच MSP वर २०% अनुदान देण्याचे वचन!

३) प्रत्येकास अन्न आणि निवारा

प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!

४) वृद्ध पेन्शन धारकांना रु.२१००

महिन्याला रु.१५०० वरुन रु.२१०० देण्याचे वचन!

५) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर

राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!

६) २५ लाख रोजगार निमिर्ती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,०००

प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,००० विद्यावेतन देण्याचे वचन!

७) ४५,००० गावांत पांदण रस्ते बांधणार 

राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!

८) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.१५००० आणि सुरक्षा कवच

महिन्याला रु.१५,००० वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!

९) वीज बिलात ३०% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!

१०) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@२०२९ ‘ 

 १०० दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन! 

-------------

Post a Comment

Previous Post Next Post