प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल चोरी प्रकरणी राकेश बाळासो खोत (वय 19.रा.लक्ष्मीमाळ कबनुर ) अमर शिवाजी सदलगे (वय 20.रा.साजणी )आणि रजनीश मोहन सोनार(वय 26.रा.कबनुर हायस्कूल जवळ,कबनूर) या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 20 हजार रुपये रोख व एक स्कार्पिओ,व एक डिझायर गाडी आणि इतर साहित्य असा एकूण पंधरा लाख चाळीस हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त त्यांच्यावर वडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर आपल्या वाहनांत आणि क्यन मध्ये पेट्रोल ,डिझेल भरुन पैसे न देता भरधाव वेगाने जात होते.त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली ,सांगोला आणि कर्नाटकात अशा 16 ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत.या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिये येथे राम पेट्रोल पंपावर ताब्यात घेतले.
ज्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा गुन्हा घडला असल्यास संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.
--------------------------------------
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणखी एका कारवाईत फसवणुकीतील फरारी आरोपीस अटक केली आहे.रंगराव आनंदराव पाटील (वय 48.रा.वडणगे) याला अटक केली आहे.हा गेल्या दोन वर्षांपासून फरारी होता.त्याने फुलेवाडी येथील सचिन सदाशिव कुडाळकर यांच्यासह सात जणांना फ्ल्यट देतो म्हणुन फसवणूक केली होती.याच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.त्याच प्रमाणे रामांनदनगर येथील गायत्री ध्रुव जाधव यांचे 15 तोळे सोने मित्राकडे गहाण ठेऊन सदर महिलेची फसवणूक केल्यामुळे त्याच्यावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी होता.तो वारंवार आपले वास्तव्य बदलत होता.हा आरोपी रुकडी येथे रहात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली असता त्यांनी रुकडी येथे सात दिवस सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला पुढ़ील तपासासाठी आर्थिक गुन्हें अण्वेशन शाखेच्या ताब्यात देण्यात आले.
या दोन्ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.