प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पट्टणकोडोली येथील सुप्रिया अनिकेत कांबळे (वय २२ रा. सांगरुळ, ता. करवीर सध्या रा.पट्टणकोडोली) या नऊ महिन्याच्या गर्भवती असून त्यांच्या पोटात दुखू लागल्याने गुरुवारी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी स्त्री जातीच्या अर्भकास जन्म दिला.दुपार पर्यंत सुप्रिया याचा तब्येत बरी होती.पण दुपारच्या पुढ़े तब्येत बिघडल्याने त्यातच गर्भवती महिलेचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. अचानक झालेल्या या घटनेने नातेवाईकांनी रुग्णालयात संताप व्यक्त केला. सुप्रिया हिचे माहेर पट्टणकोडोली असून सासर सांगरुळ आहे. तिच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली.या घटनेची माहिती हुपरी पोलिसांना समजताच पोलिसांनी पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला.त्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.