महाराष्ट्राला धोका नाही पण मुंबई शहराची सुरक्षा व्यवस्था असुरक्षित आहे. सुरक्षा व्यवस्था खिळखिळी झाल्यास भविष्यात मुंबईला धोका होऊ शकतो, अशी भीती राष्ट्रीय दहशतवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष मनिंदरजीतसिंह बिट्टा यांचे मत.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - महाआरोग्य शिबिरासाठी इंचलकरंजी येथे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अध्यक्ष बिट्टा म्हणाले, देशात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी सुरक्षा व्यवस्थेचे धोरण ठरविणारे अधिकारी महत्वाचे असतात. जनतेची सर्व सुरक्षा त्यांच्यावर असते. महाराष्ट्रातील मुंबई शहर वगळता सर्व शहरे सुरक्षित आहेत. मुंबईतील सुरक्षा व्यवस्था मात्र धोक्यात आहे. 

देशात दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. मात्र मोठे गँगस्टारचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यापासून सामाजिक स्वास्थ्य बिघडविले जात आहे. हल्ले करुन ते परराज्यासह देशाबाहेरही लपत आहे. पाकिस्तान कॅनडा, अमेरिका सारख्या देशांत आश्रय घेतलेल्या खालिस्तानी दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत आहे. त्या ठिकाणाहून कॅनडामध्ये धार्मिक स्थळावर हल्ले केले जात आहे. तेथून भारतातील धार्मिक स्थळावर हल्ला करण्याची धमकी दिली जात आहे. या सर्वांचा बिमोड करण्यासाठी दहशतवादी विरोधी पथक सक्षमपणे कार्यरत आहे. 

बिट्टा म्हणाले, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सक्षम बनला आहे. भारताची जगातील सर्वच देशाला धास्ती आहे.जम्मू आणि काश्मीरमधील ३७० हे कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हटवले . जम्मू आणि काश्मीरमधील मूठभर माती देखील पाकिस्तानला दिली जाणार नाही. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अनेकदा स्टिंग ऑपरेशन करुन दहशतवाद संपविला जात आहे. या वेळी इचलकरंजीचे उद्योगपती रतनसिंह मेहता, जतनसिंह मेहता, पंकज मेहता आणि अथायु हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बसवराज कडलगे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post