मुलाने केला वृध्द बापाचा खून.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- हुपरी येथील आप्पासो कृष्णा नुले (वय 70.रा.गंगानगर ,हुपरी ) यांचा गुरुवार(दि.14) रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान डोक्यात लोंखंडी रॉडचा वर्मी घाव बसल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला.या घटनेची माहिती हुपरी पोलिसांना समजताच हुपरी पोलिस घटना स्थळी जाऊन माहिती घेऊन या खून प्रकरणी मयताचा मुलगा अनिल आप्पासो नुले (वय 45) यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत आप्पासो नुले हे आपल्या कुंटुबिया समवेत  रहात असून त्यांना दोन मुले होती.त्यातील एकाचे निधन झाले असून त्यांचा दुसरा मुलगा अनिल यांचे लग्न झाले आहे.अनिल याला वीस वर्षांचा मुलगा आहे.आरोपी अनिल यांने पंधरा -सोळा वर्षांपूर्वी पत्नीचा संशय घेऊन खून केला होता.या खून प्रकरणी अनिलसह त्याच्या आई-वडीलांना 14 वर्षाची शिक्षा झाली होती.ते सर्व जण शिक्षा भोगून एक-दीड वर्षापूर्वी बाहेर आले होते.ते बाप लेक शेती व्यवसाय करत असत.त्यांच्यात किरकोळ कारणातुन वारंवार भांडणे होत असत.त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी त्याचे नातेवाईक किंवा शेजारी पाजारी गेले तर त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण करत असत यामुळे त्यांच्यात कुणी जात नव्हते.गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास किरकोळ कारणातुन बाप लेकात वाद झाला.या वादातुन रागाच्या भरात आरोपी अनिल याने वडील आप्पासो यांचा लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात,पाठीत आणि पायावर जोरात मारहाण करु लागल्याने त्यातच त्यांचा मृत्यु झाला .अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.या खूनाची माहिती हुपरी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून प्रथम हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला तेथुन शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात पाठवून सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात.

या खून प्रकरणी आरोपी मुलगा अनिल नुले याला अटक केली असून पुढ़ील तपास हुपरी पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post