प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - मोक्का कारवाईतील फरारी आरोपी राजेश उर्फ राजू मधु बोडेकर (वय २१, रा. जांभळे कॉलनी, धनगरवाडा, बोंद्रेनगर, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी बोंद्रेनगरात सापळा रचून अटक केली.
बॅनर फाडण्याच्या कारणावरुन झालेल्या माराहणीच्या वैमनस्यातून ३१ मे, २०२३ रोजी दुपारी दोन वाजता अर्धा शिवाजी पुतळा चौक, शिवाजी पेठ येथे फिर्यादी संभाजी फाले ( नृसिंह कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड) आणि त्याचा मित्र प्रकाश बोडके उभे होते. त्या वेळी मोटारसायकलवरुन आलेल्या युवराज शेळके, कृष्णात बोडेकर, केदार घुरके, करण शेळके, राहुल हेगडे, राजू बोडके, विकास उर्फ चिक्या भिंऊगडे यांनी संगनमताने कट करुन दमदाटी, शिवीगाळ करुन तलवारीने वार केले होते. त्यात प्रकाश बोडके आणि संभाजी फाले हे दोघे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत कारवाई केली होती. या गुन्ह्यात राजेश बोडेकर याचा मोठा सहभाग होता. हा गुन्हा घडल्या पासून फरारी होता.राजेश बोडेकर हा आरोपी हा २६ नोव्हेंबर रोजी बोंद्रेनगरात आल्याची माहिती गुन्हे पथकाला मिळाली असता. त्याला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
ही कारवाई जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. संजीव झाडे, गुन्हे शोध पथकाचे श्री. संतोष गळवे, पोलिस हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, सतीश बांबरे, अमर पाटील, प्रवीण सावंत, प्रशांत पांडव, पोलिस नाईक संदीप माने, वैभव खोत, निलेश नाझरे, मोहन लगारे यांनी केली.