स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-गडहिग्लज तालुक्यातील सांबरे ते कुमरी मार्गावर बेकायदेशीर गोवा बनावटीची दारु वहातुक करणारी टाटा योध्दा गाडी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पकडली.त्यात दहा लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली.या प्रकरणी प्रितेश उल्हास जंगम (वय33.मुळगाव बिचोलीम ,गोवा.सध्या कोनाळ कट्टा ,दोंडामार्ग) याला ताब्यात घेतले.प्रितेश जंगम याच्या कडील टाटा योध्दा गाडी नं (GA-04 -T- 6600) याची तपासणी केली असता या गाडीत वेगवेगळ्या कंपनीची दहा लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु निदर्शनास आली.या दारुसह गुन्हयांत वापरलेली सहा लाख रुपये किमंतीची टाटा योध्दा गाडी असा एकूण सोळा लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस सुरेश पाटील,समीर कांबळे,राम कोळी,राजू कांबळे यांच्यासह आदीने केली.