सिक्युरिटी गार्डचा बांधकामाच्या खड्डयात पडून मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- पार्वती टॉकीजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बुलेट शोरुम समोर बांधकाम चालू असलेल्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्डयात पडुन बाळासाहेब धोंडिराम कांबळे (वय 50.रा.शिंगणापूर ,मुळ रा.वारे वसाहत कोल्हापुर) यांचा शनिवार (दि.30) रोजी सीपीआर  रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत हे अय्क्शन इंटीलिजन सिक्युरीटी कंपनीकडे गेल्या दोन महिन्यांपासून सिक्युरिटी गार्ड म्हणुन काम करीत होते.शनिवार (दि.30) रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास कामावर आलेल्या बांधकाम कामगारांना बाळासाहेब कांबळे हे खड्डयात पडल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी बांधकाम कंन्स्ट्रक्शनच्या मालकांना याची माहिती दिली असता त्यांनी  सिक्युरीटी कंपनीच्या संबंधितांना   झालेल्या घटनेची माहिती दिल्याने त्यांनी  सुपरवायझरला माहिती दिली. सुपरवायझरने तात्काळ  बाळासाहेब कांबळेच्या नातेवाईकांना दिली . नातेवाईक घटना स्थळी जाऊन  खड्डयात पडून जखमी झालेल्या बाळासाहेब यांना  बाहेर काढ़ुन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचार चालू असताना मृत्यु झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post