मोटार सायकल चोरट्यांकडुन तीन मोटारसायकल जप्त.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणी मयुरेश अमर पाटील (वय 24.रा.शिवाजी पार्क )याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील तीन मोटारसायकली जप्त करून  वाहन चोरीचे तीन गुन्हें उघडकीस आणले.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .त्या अनुशंगाने वाहन चोरीची माहिती घेऊन तपास करीत असताना पोलिस रेकॉर्डवरील वाहन चोरटा रविवार (दि.17) रोजी ताराबाई पार्क परिसरात असलेल्या ताराबाई गार्डन येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून विना नंबर प्लेट असलेल्या अक्टिव्हा मोपेड गाडीसह मयुरेश पाटील याला ताब्यात घेऊन गाडी विषयी माहिती घेतली असता जुना राजवाडा पोलिस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समजले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखी दोन मोटारसायकल चोरीची कबुली दिल्याने त्या दोन मोटारसायकल जप्त करून एकूण 80 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या पथकाने वाहन चोरीचे जुना राजवाडा,शाहुपुरी आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले .

पुढ़ील तपासासाठी आरोपी मयुरेश पाटील याला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपी मयुरेश पाटील यांच्यावर 2021 मध्ये शाहुपुरी पोलिस ठाण्यात चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post