हॉटेल व्यावसायिकाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढ़ुन घेऊन मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांना अटक.2 डिसे.पर्यत कोठडी. चौघांचा शोध सुरु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- नागाळा पार्क येथे हॉटेल व्यावसायिक अक्षय सुधीर देशपांडे (वय 28.रा.विश्वकर्मा सोसायटी,खानविलकर पेट्रोलपंप शेजारी ,को.)  त्याची सोन्याची चेन आणि अंगठी जबरदस्तीने काढ़ुन घेऊन नऊ जणांनी मारहाण करून पळुन गेले होते.याची फिर्याद जखमी अक्षय यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.पोलिसांनी नऊ जणांच्यावर गुन्हा दाखल करून त्यातील आकाश उर्फ आकु अनिल सांळुखे (वय 27),विशाल  उर्फ सर्किट अनिल सांळुखे (वय 30.दोघे रा.सोमवार पेठ),,युवराज सुरज मोडीकर ( अण्णा किराणा जवळ, कनाननगर ),प्रणित राजेंद्र मगदूम (वय 26,वळीवडे ) आणि विकेश वसंत मुल्या (घोरपडे गल्ली,शाहुपुरी) या पाच जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 डिसे.पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सोहेल उर्फ बॉब शेख मुल्या (रा.घोरपडे गल्ली ,शाहुपुरी) ,हर्षल नार्वेकर (शाहुपुरी) वैभव सांळुखे (नक्की आडनाव माहित नाही) आणि मन्सूर शेख यांचा पोलिस शोध घेत आहेत.

शुक्रवार (दि.29)रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास नागाळा पार्क परिसरात अक्षय देशपांडे  हे आपल्या दुचाकी वरुन जात असताना चारचाकीतुन आलेल्या वरील आरोपीनी  यांना एडका आणि हॉकी स्टिकने  मारहाण करून त्याच्या कडील दीड लाख रुपये किमंतीची सोन्याची चेन आणि नव्वद हजार रुपये किमंतीची सोन्याची अंगठी असा एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता.या गुन्हयांचा तपास पोसई शितल पालेकर ह्या करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post