प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- गगनबावडा तालुक्यातील कातळी येथील धनाजी कुमार कोकरे (वय 24) याने शनिवार(दि.16) रोजी रात्रीच्या सुमारास रहात असलेल्या घराच्या दारात विषारी औषध सेवन केले होते.त्यांने उलट्या करीत असताना नातेवाईकांनी प्रथम गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथून उपचार घेऊन गंगावेश येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.तेथे उपचार चालू असताना गुरुवारी त्याचा मृत्यु झाला.या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना समजताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला असता सदर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
यातील मयत धनाजी याचे बारावी पर्यत शिक्षण झाले असून तो वैभववाडी येथे भैरेभवानी ट्रान्स्पोर्ट कंपनीत व्यवस्थापक म्हणुन नोकरी करत होता.त्याच्या पश्च्यात तिघे भाऊ आणि दोन बहिणी आहेत.