प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील उमाजी दिनकर चौगुले (वय 46.रा.पाटील गल्ली ) हे शुक्रवार (दि.22) रोजी सकाळी नऊच्या सुमारास माळ नावाच्या शेतात ऊसाची मोळी डोक्यावरून घेऊन येत असताना पडल्याने त्यांना बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हे पडेल ते काम करीत होते.त्यांच्या गावात ऊसाची तोड आल्याने हा मजूर म्हणुन ऊस तोडण्यास गेला होता .त्याच्या सोबत इतरही शेत मजूर ऊस तोडण्यासाठी सोबतीला होते.ऊस तोडुन झाल्यानंतर त्याची मोळी करून ट्रॅक्टर मध्ये भरण्यासाठी डोक्यावरून घेऊन जात असताना पडल्याने त्यात ते बेशुध्द होऊन खाली पडले होते.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पत्नी ,एक मुलगा आणि दोन मुली आहेत.