प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मोटारसायकल वरुन जात असताना स्पिडब्रेकरवर मोटारसायकल जोराची आदळून खाली पडल्याने कमल सुरेश पोवार (वय 42.रा.नालासोपारा,मुळगाव शिंदे कॉलेज जवळ गडहिग्लज) यांचा शनिवार (दि.23) मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत कमल या आपल्या कुंटुबिया समवेत नालसोपारा येथे रहाण्यास असून त्यांचे पती तेथे सिक्युरिटी गार्ड म्हणुन काम करीत करतात.त्यांचे माहेर गडहिग्लज असून सासर ठिकपुर्ली (नरेवाडी) आहे.त्या एकट्याच सासरी येथे मतदान करण्यासाठी आल्या होत्या.शनिवारी आपल्या गावी परत जाण्यासाठी गडहिग्लज येथील विश्रामगृह येथे ट्रॅव्हल लागत असल्याने त्या शेजारच्या मुलासोबत आपले साहित्य ठेवण्यासाठी मोटारसायकल वरुन जात असताना वाटेत स्पिड ब्रेकर असल्याने त्याचा मोटारसायकल स्वारास अंदाज न आल्याने मोटारसायकल जोरात आदळल्याने कमल या खाली पडून गंभीर जखमी झाल्याने गडहिग्लज येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना मृत्यु झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
त्यांच्या पश्च्यात पती,एक मुलगा आणि मुलगी आहे.