" चक्क दोन्ही हाताच्या बोटाला शाई " , मतदान अधिकाऱ्याचे अज्ञान ,मतदाराच्या दोन्ही बोटाला लावली शाई.

कोल्हापूर जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  - विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 20 नोव्हेंबर रोजी कोल्हापुर जिल्हयात प्रत्येक ठिकाणी चुरशीने मतदान झाले.या मध्ये सकाळच्या सत्रात ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.निवडणुकीच्या काळात मतदान प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी प्रशिक्षीत अधिकारी यांची नेमणूक केली जाते.पण इंचलकरंजी मतदार संघातील एका मतदान केंद्रावर एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

इंचलकरंजी येथील आंतरभारतीय विद्यालय वेताळ पेठ,नवीन इमारत खोली नं.10. नावाच्या मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिक बाबूराव तुकाराम पागडे  हे  सकाळी सर्व प्रथम मतदान करण्यासाठी गेले असता तेथील प्रशिक्षीत अधिकारयांला मतदाराच्या कोणत्या बोटाला शाई लावावी हे त्या अधिकारयांला माहित नसल्याने त्याने चक्क बाबूराव पागडे  यांच्या दोन्ही बोटाला शाई लावून आपले आज्ञान पाजळले. याची चर्चा त्या परिसरात चालू होती.निवणुक आयोगाकडुन महसूल विभाग ,शिक्षक ,तसेच महानगरपालिकासह इतर विभागातील कर्मचारी नेमले जातात.त्यांना संबंधित विभागाकडुन प्रशिक्षण दिले जाते.तरी सुध्दा या महाभागाने मतदाराच्या दोन्ही बोटाला शाई लावून मतदान करुन घेऊन त्या जेष्ठ मतदार बाबूराव पागडे यांचा शासकीय विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.पण या प्रकारामुळे त्या मतदान परिसरात चर्चा चालू होती.

या प्रशिक्षण काळात हे महाशय प्रशिक्षण घेत होते का या कडे दुर्लक्ष करत होते.असा प्रश्न निर्माण झाला आहे.हीच जर शाई मतदार दोन्ही हाताच्या बोटावर शाई लावून गेला असता तर त्या मतदारावर कारवाई झाली नसती का ?असा प्रश्न काहीनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post