प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - बेकायदेशीररित्या विना परवाना देशी दारूची वहातुक केल्या प्रकरणी महेश बाळासो पाटील (वय 36.रा.नवे पारगांव ,ता.हातकंणगले ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन त्याला पुढ़ील तपासासाठी वडगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैद्य व्यवसायाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या अनुशंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला रविवार (दि.03) रोजी पहाटेच्या सुमारास ओमनी कार मधून नवे पारगांव येथे वाठार ते वारणा रोडवर देशी दारूची वहातुक होणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून नवे पारगांव येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात देशी दारूची वाहतूक करीत असताना महेश पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील मारुती सुझुकी ओमनी कार नं.(MH -09 -EU - 5707) याची झडती घेतली असता त्यात असलेल्या कागदी पुठ्याच्या बॉक्स मध्ये जी.एम.डॉक्टर ,संत्रा आणि टेंगो पंच या कंपनीची देशी दारू असा एक लाख चौतीस हजार रुपये किमंतीची देशी दारू आणि चार लाख 68 हजार रुपये किमंतीची ओमनी कार असा एकूण सहा लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस शिवानंद मठपती,संजय कुंभार ,वसंत पिंगळे,संजय हुबे,रुपेश माने,कृष्णात पिंगळे,अमित मर्दाने आणि राजेंद्र वरंडेकर यांनी केली.