पोलिसांच्या क्राइम आढ़ावा बैठकीत निवडणूकीत चांगले काम केलेल्या पोलीसांचा सत्कार.

प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या क्राईम आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांच्या सुचना.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -विधानसभा निवडणूकीत गेल्या  दीड ते दोन महिन्या पासून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली चोख कामगिरी  त्यामुळे निवडणूक शांततेत पार पडल्याने  याबद्दल पोलीस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी राबलेल्या सर्वच अधिकाऱ्यांचे कौतूक करून काहींना प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. त्याच प्रमाणे प्रलंबित गुन्हे उघडकीस आणुन फरारी आरोपींचा शोध घ्यावा. तसेच फिर्यांदींना कागदपत्रे तत्काळ द्यावीत, अशा सुचना मंगळवारी झालेल्या क्राईम आढावा बैठकीत त्यांनी केल्या.

बैठकीच्या सुरुवातीस २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईत झालेल्या हल्लयातील शहिद पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर संविधान दिनाच्या निमित्ताने शपथ घेण्यात आली. या बैठकील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह सर्व विभागाचे पोलीस उपअधीक्षक,पोलीस निरीक्षक,प्रभारी पोलीस अधिकारी हजर होते.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत म्हणाले, आता पुन्हा कामाला लागा. एक वर्षापेक्षा अधिक प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र तातडीने न्यायालयात सादर करावे. प्रलंबित तक्रार अर्ज निकाली काढावे, रखडलेल्या गुन्ह्याचा तपास तातडीने करावा. आरोपींचा शोध घेऊन मालमत्ता हस्तगत करावी. अपघातांच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घ्यावा. तसेच अपघाताच्या प्रकरणातील कागदपत्रे संबंधीत तक्रारदारांना तातडीने द्यावीत. तक्रारदारांना पोलीस ठाण्यात जास्त वेळ ताटकळत बसवू नये. जे पोलीस अधिकारी कामात कसूर करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशा सुचनाही त्यांनी केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post