प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- बाहेरील आणि स्थानिक नेत्यानी जिवाची बाजी लावून प्रचार करून एकमेकावर आरोप प्रत्यारोप यामुळे मोठ्या उत्साहात 75 टक्के मतदान झाले .काही किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले.तर काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचे समजले वरुन काही कार्यकर्ते अमोर समोर आल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली.
मतदानाच्या आदल्या दिवशी राजकीय वर्चस्व असलेल्या भागात बोटाला शाई लावण्याचा प्रकार घडल्याची चर्चा दिवसभर होती.संपुर्ण कोल्हापूर शहराचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तरेत मात्र धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे."गद्दार "शब्द वापरल्याने कं.बावडा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राहुल माळी आणि राजेश क्षीरसागर गटाच्या सुनिल जाधव यांच्यात वादावादी.
कसबा बावडा येथे शिवसेनेच्या उबाठा गटाचे राहुल माळी व राजेश क्षीरसागर गटाचे सुनील जाधव या कार्यकर्त्यांनी एकमेकाला"गद्दार"' म्हणून आरोप प्रत्यारोप करु लागल्याने त्यांच्यात वाद झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल गेली. दरम्यान चौकातील एका हॉटेलमध्ये उमेदवार राजेश क्षीरसागर व सत्यजीत कदम बसले होते. जमाव त्या ठिकाणी गेला.
या दरम्यान,आमदार सतेज पाटील यांना याबाबत समजल्यानंरत काहीतरी अनुचित घटना घडण्याची शक्यता ओळखून ते भगवा चौकात आले. त्यांचे कार्यकर्तेही जमा झाले. आमदार पाटील यांनी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांना याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याखाली जमा झाला.
उत्तरेचे उमेदवार राजेश क्षीरसागरही हॉटेलमधून रस्त्यावर येऊन उभे राहिले. कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. दोन गटांचे कार्यकर्त्ये एकत्र आल्याने अनुचित घटना घडण्याची शक्यता ओळखून आमदार सतेज पाटील यांच्या सुचनेनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी राजेश क्षीरसागर यांना तेथून जाण्याची विनंती केली. त्यामुळे क्षीरसागर निघून गेले.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी हातात माईक घेऊन तरुणांना शांततेचे आवाहन केले. समजूतीची भूमिका घेऊन जमावाला शांत केले. मतदान शांतते होणे गरजेचे आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. राहुल आणि मी बसून चर्चा करतो, मी प्रत्येक गोष्टीचा हिशोब करतो हे तुम्हाला माहिती आहे.त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून शांत रहात.आपले शंभर टक्के मतदान झाले पाहिजे. शांत रहा,सय्यम बाळगा असे आवाहन केले. त्यामळे संतप्त जमाव शांत झाला. दहा ते मिनिटात तरुण तेथून निघून गेले. आमदार सतेज पाटील यांच्या या भूमिकेचे पोलीसांनीही कौतूक केले.
यावेळी शहर पोलिस उपअधिक्षक अजित टिके ,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली.या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता..
कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.