प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- वारंवार दारु पिऊन घरातील साहित्यांची मोडतोड करून, दंगा करुन संपूर्ण कुटुंबियांना त्रास देणारा सख्या भाऊ मारुती बारड याच्या खून केल्या प्रकरणी मोहन आनंदा बारड (वय ३५ रा.बिद्री ता.कागल) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.-3.श्री. शैलेद्र तांबेसो , यांनी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील म्हणुन ॲड. सुजाता इंगळे यांनी काम पाहिले.
मयत मारुती बारड हा दारुचा व्यसनी होता. कोणतेही काम न करता दारू पिऊन घरात यायचा जेवनाची भांडी, घरातील साहित्य विस्कटून नुकसान करीत होता. १७ ऑगस्ट,२०२० रोजी रात्री नऊ वाजता घरात जेवण करीत असताना आरोपी मोहन बारड व मारुती बारड यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. त्या वेळी चिडलेल्या मोहन याने रागाच्या भरात मारुतीवर खुरप्याने छातीवर वार करून गंभीर जखमी केले.त्यात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला..या घटनेची नोंद मुरगूड पोलिस ठाण्यात झाली होती.
या प्रकरणी मुरगूड पोलीसांनी आरोपी मोहन बारड यास अटक केली. तपास करून तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज न्यायाधिश श्री.शैलेंद्र तांबेसो ,यांच्या न्यायालयात चालले. सरकारी वकील ॲड. सुजाता इंगळे यांनी १२ साक्षीदार तपासले.
समोर आलेले पुरावे व सरकारी वकील यांनी जोरदार केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून न्यायाधिश श्री.शैलेंद्र तांबेसो यांनी आरोपी मोहन बारड याला आजीवन कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुरगूड पोलीस ठाण्यातील पैरवी अधिकारी संजय पाटील यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.