प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- एका नगरातील दोघे तरुण केस कापण्यासाठी गेले होते.ते ज्या दुकानात केस कापतात त्या दुकानात गर्दी असल्याने फ़ेरफ़टका मारण्यासाठी रंकाळा चौपाटीवर गेले.तेथे त्यांना सेल्फिचा फोटो काढ़ण्याचा मोह आवरला नाही.त्या वेळी रंकाळा चौपाटीवर पेव्हिंग ब्लॉक वरुन मोपेड चालविताना त्या दोघांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायलर झाल्याने रंकाळाप्रेमीतुन संतापाची लाट उसळली.हा प्रकार शुक्रवारी सातच्या सुमारास घडला होता.पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे समजते.या दोघांनी माफी मागून येथून पुढ़े आमच्या कडुन कोणतेही गैरवर्तन होणार नसल्याचे सांगितले.