प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २७९ विधानसभा मतदारसंघ निरीक्षक विशा मोहन शर्मा यांनी दि.३० ऑक्टोबर रोजी २७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघास भेट दिली.
सर्वप्रथम निवडणूक निरीक्षक विशा मोहन शर्मा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयास भेट दिली याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांचेसह सहा.निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर, वंदना पवार, सुनिल शेरखाने, डॉ.सदाशिव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवडणूक निरीक्षक यांनी नामनिर्देशन पत्रांचे छाननी प्रक्रियेचे छायाचित्रण पाहिले आणि याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. आचारसंहिता भंग प्रकरणी कार्यरत असलेल्या यंत्रणेची सविस्तर माहिती घेऊन आचारसंहितचे काटेकोरपणे पालन करणेच्या सक्त सूचना दिल्या.
त्याचबरोबर निवडणूक कामी कार्यरत असलेल्या एस.एस.टी.,एफ.एस.टी., व्हि.एस.टी.,व्हि.व्हि.टी आणि खर्च निरीक्षण पथकांची सर्वंकष माहिती घेऊन पाहणी केली आणि पथकामधील अधिकारी कर्मचारी यांना योग्य त्या सूचना दिल्या.
आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय बोर्ड, बॅनर, राजकीय पक्षांचे झेंडे,विविध ठिकाणी लावलेल्या कोनशिला झाकल्या आहेत की नाही याची सुद्धा सविस्तर माहिती घेतली. तसेच निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कामकाज प्रभावीपणे आणि काटेकोरपणे करणेच्या सूचना दिल्या.