हडपसर विधानसभा : मतदारांचा कौल कोणाला मिळणार ? प्रशांत जगताप की चेतन तुपे ..?

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि सर्वांचं लक्ष्य केंद्रीत असलेला मतदारसंघ आहे. हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे चेतन विठ्ठल तुपे हे विद्यमान आमदार आहेत.अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने यावेळीही चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे आमदार चेतन तुपे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत होणार असली तरी राष्ट्रवादी मध्येच खरी लढत होणार आहे.

यावेळी हडपसर विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांशी भिडणार आहेत. 2019 मध्ये येथून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चेतन तुपे अजित पवारांच्या पक्षात आहेत. यावेळी अजित पवार गटाने चेतन तुपे यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार गटाने प्रशांत जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या वेळी मतदारांचा कौल कोणाला मिळणार  ?  हे लवकरच कळेल..


Post a Comment

Previous Post Next Post