हडपसर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता



प्रेस मीडिया लाईव्ह :

हडपसरचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांना पाठिंंबा जाहीर केला आहे. यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बीघाडी  झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.महादेव बाबर यांनी गंगाधर बधेना दिलेल्या पाठिंंब्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीकडून माजी आमदार बाबर इच्छुक होते. मात्र जागा वाटपा मध्ये हडपसरची जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप निवडणूक लढवित असून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने विद्यमान आमदार चेतन तुपे यांना संधी दिली आहे. या मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे गंगाधर बधे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

गंगाधर बधे यांना पाठिंबा देत असल्याचे माजी आमदार बाबर यांनी पत्रकार परिषद जाहीर केले. ते म्हणाले की, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाची मोठी ताकद आहे. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी बधे यांना अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उभे करण्यात आले आहे गंगाधर बधे यांनी पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले, म्हणून त्यांना पाठिंंबा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post