प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रतिनिधी :
हड़पसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्वादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शिवसेना उद्धवव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख समीर तुपे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धडाडीचे नेतृत्व माजी नगरसेवक अॅंड. अय्युब शेख, तसेच सय्यद भाई यासिन यांनी अपक्ष म्हणून भरलेला आपला अर्ज माघारी धेत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार केला.कॉँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांबळे, तसेच इम्रानभाई शेख, अपक्ष उमेदवार नसीम भाभी शेख, किसन आदमाने यांनीही आपला अर्ज मागे घेत प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य संघटनेने जगताप यांना पाठिब्याचे पत्र दिले आहे.
या वेळी प्रशांत जगताप म्हणाले, 'हडपसर मधील निष्ठावान शिवसैनिकांची ताकद मला पुढ़ील संघर्षात बळ देणारी ठरणार आहे. रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी, तसेच पुरोगामी व समतेच्या विचारांच्या कार्यकत्यानी दिलेला पाठिंबा ऊर्जादायी आहे. महाविकास आघाड़ीच्या सर्व समावेशक, विकसनशील विचारांवर विश्वास ठेवत, समतेच्या विचारांना आंबेड़करी शक्तीची ताकद देत है सर्वजण माइ्या पाठीशी उभे राहिल्याने येथे नक्कीच परिवर्तन घडणार, असा मला विश्वास आहे.