भारतीय संविधान सन्मान रॅलीच्या वतीने देहूरोड शहरात मोठ्या उत्साहाने संविधान दिवस साजरा

डॉ बाबासाहेब आंबेडकर च्या संविधानाने सगळ्यांना एका सूत्रात बांधले कोण छोटा नाही कोण मोठा नाही व सर्वांना समान न्याय दिला :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे


प्रेस मीडिया लाईव्ह :

अन्वरअली शेख :

भारतीय संविधान सन्मान रॅली संयोजन समिती च्या वतीने देहूरोड शहरात भव्य दिव्य उत्साहाने  ७५ वा संविधान दिवस साजरा करण्यात आला , ७५ व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त भारतीय संविधान सन्मान रॅली संयोजन समितीच्या वतीने भव्य दिव्य रथावर संविधान फलक लावण्यात आले होते व रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा धारण करून हातात संविधान ग्रंथ धरून हात उंचावून रथावर स्वार होत रॅली ची सुरुवात झाली.

  प्रारंभी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटल येथील  परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. रामदास ताटे, सह खजिनदार बाबु हिरमेठकर यांनी पुष्पहार अर्पण केले. पुढे ढोल ताशा च्या निनादात  जोरदार घोषणाबाजी करत मिरवणूक पुढे निघाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधान चिरायू होवो अश्या जोरदार घोषणा देत ही रॅली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार येथे येऊन तेथे संविधान प्रदान फलकास समितीचे कार्यकारी समन्वयक ईश्वरसेठ अगरवाल यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तेथून जोरदार घोषणाबाजी करत ढोल ताशा पथकाने आपली कला दाखवत जोरदार ढोलताशे वाजवित ही मिरवणूक व्यवहारे गैरेज येथुन वाल्मिकी समाज मंदिर, सुभाषचंद्र बोस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मुख्य बाजारपेठ पेठ,  वाजत गाजत जोरदार घोषणाबाजी करत व फटाक्यांची आतषबाजी करत परत ढोलताशांच्या निनादात जोरदार घोषणाबाजी केली.

 बाजारपेतील सुप्रसिद्ध व्यापारी व जेष्ठ नेते कांतीलाल पारेख सेठ यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिव स्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास समितीचे समन्वयक राजाराम अस्वरे ( दादा ) यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आले. तेथुन हेही मिरवणूक महात्मा फुले मंडई व वृंदावन चौक येथे आली असता फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संविधान दिनाचा विजय असो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, हम सब एक है, भारतीय संविधान चिरायू होवो असे जोरदार घोषणाबाजी केली.तेथुन वाजत गाजत पारशी चाळ मार्गे सवाना उपहारगृह जवळील देहुरोड अंकित पोलीस ठाणे जवळ परत जोरदार ढोलताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुन्हा मुंबई पुणे महामार्गाने वाजतगाजत घोषणा देत ही मिरवणूक रॅली  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार येथे येताच ढोल लेझीम पथकाने परत ढोल ताशा वाजवून अख्खा परिसर दणाणून सोडला. जोरदार घोषणाबाजीने रॅली ची सांगता झाली. 

      रॅली चे रूपांतर कार्यक्रमात झाले. भव्य दिव्य मंचावर रॅली मध्ये सामिल झालेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी भारतीय संविधाचाचे महत्व व  संविधान दिवस या विषयावर महत्वपूर्ण संदेश देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले त्यास दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस लागले संविधान बनण्यापुर्वी मसुदा तयार करण्यात आला पण समिती वर असलेले अनेक मान्यवर अनुपस्थित होते, शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान पुर्ण केले . आज या संविधानामुळे आम्ही सर्व एकासुत्रात बांधले गेले आहोत. कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, सर्वांसाठी एकच समान कायदा असून मतदानाचा अधिकार दिला. आजच्या दिवशी २६ नवंबर १९४९ ला देशाला संविधान प्रदान केले आणि २६ जानेवारी १९५० ला अंमलबजावणीला सुरूवात झाली अशी संविधानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा देहूरोड व धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २४ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान व मुलभूत हक्क या विषयांवर  भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शाखा महिलाध्यक्षा पुष्पा कांबळे यांचे अध्यक्षतेखाली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत प्रथम क्रमांक चि, संग्राम सुनिल वाव्हळे, द्वितीय क्रमांक कु. स्तुती दिगंबर राक्षे तर तृतीय क्रमांक चि. आदित्य अमोल बनसोडे यांना तर कुमारी सहाना संजय कांबळे व  कु. लक्ष्मी खाजु सिताफळे यांना उत्तेजनार्थ स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र   तसेच माई बाल भवनच्या दिव्यांग राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारत देशाचे नाव उज्ज्वल करणारे व राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे नेतृत्व केलेले स्वाती माने, कोमल गायकवाड तसेच संस्थेचे संचालक मधुकर इंगळे यांचा सत्कार  देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे व समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्कार पंचशील उपरणे, संविधान ग्रंथ व पुष्पगुच्छ समितीचे बाबु हिरमेठकर,  विजय वाघमारे, डाॅ. रामदास ताटे यांच्या हस्ते  करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष म्हस्के यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या हस्ते पंचशील व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . 

    कार्यक्रमांचे आयोजन नियोजन समितीचे मुख्य समन्वयक अशोक कांबळे , अध्यक्ष डॉ. रामदास ताटे, कार्याध्यक्ष अमोल नाईकनवरे, उपाध्यक्ष संजय आगळे, एम डी चौधरी , दिपक चौगुले, चंद्रशेखर

पात्रे , खजिनदार विजय पवार , सह खजिनदार बाबु हिरमेठकर, रजाक शेख, कार्यकारी समन्वयक ईश्वरसेठ अगरवाल, राजाराम अस्वरे दादा, मोझेस दास, प्रभाकर निकम, जावेद शेख, श्रीमंत शिवशरण,बल्ली आण्णा, संजय गायकवाड यांनी केले. प्रकाश कांबळे रुईकर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत सजविलेल्या रथात आपल्या हातात संविधान प्रत व संसद भवन दिल्लीकडे दाखविणारे हाताचे बोट हे ह्या मिरवणूकीचे विशेष आकर्षण ठरले. मिरवणूकी दरम्यान घोषणा के .एच.सूर्यवंशी यांनी तर कार्यक्रम स्थळी सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले.

        या रॅलीत काॅंग्रेसचे युवक अध्यक्ष नेते जावेद शेख, पत्रकार रमेश कांबळे,लोकमत १८ न्युज चॅनल चे गणेश दुडम, पत्रकार अनवर अली शेख , मानवाधिकार संघटनेचे तन्वीर मुजावर, इरप्पा कोलटल्या सह भा. बौ. महासभा महिला शाखेच्या पदाधिकारी तसेच देहूरोड चे अनेक सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

       देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार वाव्हळे,फौजदार बनसोडे व पोलीस कर्मचारी यांनी उत्तम बंदोबस्त केला होता.

      कार्यक्रमाचा शेवटी २६/११च्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या जवानाचे व मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post