फरारी तोतया पत्रकारांच्या टोळीतील एक जण ताब्यात. तीन दिवसांची पोलीस कोठडी ;

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर  - खंडणी प्रकरणातील लक्ष्मीपुरी येथील एका प्लॉस्टिक व्यापाऱ्यास धमकावणाऱ्या तोतया पत्रकारांवर लक्ष्मीपुरी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. यातील मुख्य सुत्रदार अन्सार मुल्ला फरारी असून त्याचा साथीदार असलेला  तोतया पत्रकार रहिमतुल्ला बादशहा पिंजारी (वय ३९ रा. पिंजार गल्ली,कसबा बावडा) याला  मंगळवारी अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

     अन्सार मुल्ला आणि कथित सामाजिक कार्यकर्ता अजित पवार यांनी आपल्या साथीदारांसह लक्ष्मीपुरीतील प्लास्टिक विक्रेता सनी दर्डा यांच्या दुकानावर कारवाईची भीती दाखवून खंडणीची मागणी केली होती.अन्सार मुल्ला याने ८ऑक्टोंबर रोजी ३ लाखांची खंडणीही उकळली होती.  सनी दर्डा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार   पोलिसांनी १६ संशयितांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यत पाच जणांना अटक केली.

    रहिमतुल्ला पिंजारी हा गुन्हा दाखल झाल्या पासून मुंबई येथे जाऊन लपला होता.आज   मंगळवारी स्वत:हून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. अन्सार मुल्ला आणि सागर चौगुले यांच्यासह पाच जणांचा अटकपूर्व जामीनअर्ज जिल्हा न्यायालयाने ५ नोव्हेंबर रोजी फेटाळला आहे. त्यामुळे तेही लवकरच शरण येण्याची शक्यता लक्ष्मीपुरी  पोलिसांनी वर्तवली आहे.

----------------------------------------

 " पाच हजार मिळणार म्हणुन खुश झाला आणि गुन्हयांत अडकला "   यात अटक केलेला रहिमतुल्ला पिंजारी हा रिक्षा चालक असून  एका दिवसाचे पाच हजार रुपये देतो असे सांगून अन्सार मुल्ला याने रहिमला ८ ऑक्टोंबर रोजी बनावट छापा टाकण्यासाठी सोबत  नेले होते. त्यासाठी त्याला पाच हजार रुपये दिले होते. दोन दिवसांची गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंजारी घाबरला व त्याने पाच हजार रुपये अन्सारला परत करून  गुन्हयात माझे नाव घेऊ नको अशी विनंतीही केल्याचे सांगितले असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post